UNSC On India Pakistan Conflict : भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
Pahalgam attack global reaction : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच दोन्ही देशांनी शांतता पाळावी असं यूएनएससीने म्हंटलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतानाच या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी शांतता राखण्याचा सल्ला यूएनएससीने दिला आहे. युद्ध हे या समस्येवरचं उत्तर नाही, असंही या परिषदेत म्हंटलं गेलं आहे. यूएनएससीच्या सेक्रेटरी अॅंटीनिओ गटेरस यांनी हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हंटलं की, मी पहलगामच्या हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो. सामान्य नागरिकांवर हल्ला करणं हे अक्षम्य आहे. हल्लेखोरांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे. सैन्य कारवाई हे या समस्येवरचं उत्तर नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने शांतता पाळावी असं मी दोन्ही देशांना विनंती करतो’, असं अॅंटीनिओ गटेरस यांनी म्हंटलं आहे.
Published on: May 06, 2025 12:32 PM
