Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी अवकाळीची हजेरी

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी अवकाळीची हजेरी

| Updated on: May 14, 2025 | 9:19 AM

maharashtra rain updates : संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. आमरावतीच्या असलपुरमधील हरम तबलार मार्गे असलपूरला जाणाऱ्या रस्त्यावर झाडं उन्मळून पडलेली आहे. सांगलीत देखील अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतो आहे. तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील सलग सहाव्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली. सोमवारी लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

Published on: May 14, 2025 09:19 AM