पुणे जिल्ह्यात अवकाळीचा कहर, काढणीला आलेलं ज्वारीचं पिक आडवं

| Updated on: Nov 27, 2023 | 3:18 PM

राज्यात आधी मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि आता गारपिटीच्या तडाख्याने बळीराजा शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसराला वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. तर आंबेगाव, खेड या ठिकाणी काढणीला आलेलं ज्वारीचं पिक आडवं झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय

Follow us on

पुणे, २७ नोव्हेंबर २०२३ : राज्यात एकीकडे थंडीची चाहुल लागली असताना मध्येच अवकाळी पावसाने चांगलंच थैमान घातलंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात आधी मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि आता गारपिटीच्या तडाख्याने बळीराजा शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसराला वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला असून या गारपिटीच्या पावसाने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तविला होता. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार, राज्यात अवकाळीसह गारपीटनं कहर केले आहे. पुण्यातील आंबेगाव, खेड या ठिकाणी काढणीला आलेलं ज्वारीचं पिक आडवं झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं आहे.