Raigad Avkali Rain | महाड, माणगाव, पोलादपूरला जोरदार पावसानं झोडपलं
या अवकाळी पावसामुळे भुईमूग, मटकी, कलिंगड, मूग अशा विविध प्रकारच्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आंबा पिकाचे ही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगड : दक्षिण रायगडमधील काही भागात महाड माणगाव गोरेगाव पोलारपुरसह विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली तर बाजारपेठ या पावसामुळे ओस पडल्या. या अवकाळी पावसामुळे भुईमूग, मटकी, कलिंगड, मूग अशा विविध प्रकारच्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आंबा पिकाचे ही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
