Yogi Adityanath On Abu Azami : .. नाहीतर त्यांना युपीला पाठवा, योगी आदित्यनाथ यांची अबू आझमींवर टीका

Yogi Adityanath On Abu Azami : .. नाहीतर त्यांना युपीला पाठवा, योगी आदित्यनाथ यांची अबू आझमींवर टीका

| Updated on: Mar 05, 2025 | 6:46 PM

CM Yogi Adityanath Criticized MLA Abu Azami : योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना अबू आझमी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर युपीमध्ये देखील टीका होत आहे.

सपाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबावर केलेल्या विधानाचे पडसाद युपीच्या विधानसभेत देखील उमटलेले बघायला मिळाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेत समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. अबू आझमी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, त्या माणसाला पक्षातून बाहेर काढा आणि नसेल तर यूपीला पाठवा. उत्तर प्रदेश अशा लोकांना चांगली वागणूक देतो.

अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हंटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांच्या वादग्रस्त विधानाने वातावरण तापल्यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं आहे. मात्र त्यांच्यावर टीका होत आहे. युपीच्या विधानसभेत देखील त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळ झालेला बघायला मिळाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

Published on: Mar 05, 2025 02:29 PM