America : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; मान्यता मिळाली, आता अमेरिका भारताला…

America : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; मान्यता मिळाली, आता अमेरिका भारताला…

| Updated on: May 01, 2025 | 5:34 PM

अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून आता भारताला लष्करी साहित्य पुरवण्यास मान्यता देण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तर यापूर्वी दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत उभी असल्याचेही पाहायला मिळाले होते.

भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून आता भारताला लष्करी साहित्य पुरवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे अमेरिका आता पुढे आली आहे. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्यास सांगितले आहे. अमेरिकेने असे म्हटले की, दहशतवादाविरुद्ध नवी दिल्लीच्या पाठीशी उभे आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत इस्लामाबादने सहकार्य करावे, असेही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.

तर नुकतीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत, रुबियो यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. रुबियो यांनी भारताला दक्षिण आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता-सुरक्षा राखण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करण्यास प्रोत्साहित केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 01, 2025 05:34 PM