Mumbai | कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरण बंद, प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन

| Updated on: Aug 13, 2021 | 9:47 AM

मुंबईमध्ये आज लसीकरण बंद आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे शासकीय आणि महानगर पालिकेच्या केंद्रावर लसीकरण होणार नाही. एकीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना विविध ठिकाणी सूट देण्यात येत आहे. तर दुसरीकडे पालिकेकडूनच नियमित लसीकरण होत नाही अशी तक्रार मुंबईकर करत आहे.

Follow us on
मुंबईमध्ये आज लसीकरण बंद आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे शासकीय आणि महानगर पालिकेच्या केंद्रावर लसीकरण होणार नाही. एकीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना विविध ठिकाणी सूट देण्यात येत आहे. तर दुसरीकडे पालिकेकडूनच नियमित लसीकरण होत नाही अशी तक्रार मुंबईकर करत आहे. दरम्यान, काल 12 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त झाले असून त्याचे वितरण शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे उद्या 14 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल.