“संजय राऊत एकाच पक्षातून 4 वेळा खासदार, तर नारायण राणे भीतीपोटी भाजपात”, नितेश राणे यांना ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Aug 03, 2023 | 2:40 PM

सातत्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे टीका करत असतात. आता याच नितेश राणे यांना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मातोश्री दोन बांधलं.

Follow us on

सिंधुदुर्ग : सातत्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे टीका करत असतात. आता याच नितेश राणे यांना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मातोश्री दोन बांधलं. मात्र बाळासाहेबांचं स्मारक बाधू शकले नाहीत”, अशी बोचरी टीका “नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. यावर वैभव नाईक यांनी, “बाळासाहेबांच्या स्मारक संदर्भात सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. लवकरच बाळासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक बांधण्यात येणार आहे”, असं सांगितलं. तसेच “संजय राऊत नवीन संसदेची पायरी चढणार नाही”, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. यावर बोलताना वैभव नाईक यांनी, संजय राऊत आतापर्यंत चार वेळा खासदार झाले. तेही एकाच पक्षातून खासदार झाले.मात्र राणे कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी झाले, असा टोला लगावला. “भाजपला आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची खुमखुमी आहे. ईडीला सगळेच सामोरे गेले. मात्र ईडीच्या भीतीने राणे भाजपमध्ये गेले. त्यामुळे नितेश राणेंना कर नाही त्याला डर कसला हे बोलण्याचा अधिकार नाही”, अशी टीकाही वैभव नाईक यांनी केली आहे.