Vaishnavi Hagawane Case : माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर… हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेचा नणंद अन् दिरावर गंभीर आरोप, सगळंच सांगितलं

Vaishnavi Hagawane Case : माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर… हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेचा नणंद अन् दिरावर गंभीर आरोप, सगळंच सांगितलं

| Updated on: May 24, 2025 | 11:31 AM

वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पज मृत्यू झाल्यानंतर हगवणे कुटुंबीयांचे नवीन कारनामे समोर येऊ लागले आहे. ज्यापद्धतीने वैष्णवीला मारहाण केली, छळ केला तसंच मोठ्या सुनेच्या बाबतीतही घटल्याचे समोर आले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दरम्यान ही हत्या होती आत्महत्या याचा तपास आता सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीतून राजेंद्र हगवणेंची हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मोठ्या सुनेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. ‘सुशील हगवणे यांच्यासोबत २०२२ साली लग्न झालं होतं. माझी नणंद, दीर आणि सासू कायम टॉर्चर करत होते. पण माझा नवरा कायम माझ्यासोबत होता. यासगळ्या प्रकरणामध्ये माझी बाजू नवरा घेत असल्याने त्यांनी त्यांच्या पोटच्या मुलाला देखील मारहाण केली आहे.’, असं मयुरी जगताप हगवणे यांनी सांगितलंय. पुढे त्या असेही म्हणाल्या की, माझ्या नणंदेने आणि दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला होता. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर हात टाकला आहे. त्यानंतर आम्ही वेगळा राहायचा प्रयत्न केला पण त्यांनी तेही यशस्वी होऊ दिलं नाही. आम्हाला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला असल्याचा गंभीर आरोप मयुरी हगवणे यांनी हगवणे कुटुंबावर केला.

Published on: May 22, 2025 12:53 PM