Varsha Raut : वर्षा संजय राऊत यांची साडेनऊ तास चौकशी, गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण

Varsha Raut : वर्षा संजय राऊत यांची साडेनऊ तास चौकशी, गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण

| Updated on: Aug 06, 2022 | 9:08 PM

प्रवीण राऊतांकडून एक कोटी 60 लाख रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊतांच्या अकाउंटवर आले. वर्षा राऊतांच्या खात्यात एक कोटी 8 लाखांची रक्कम आली. ही रक्कम कोणी पाठविली याचाही शोध ईडीला घ्यायचा आहे.

मुंबई : संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊतांची (Varsha Sanjay Raut interrogated ) ईडी कार्यालयातील चौकशी संपली. साडेनऊ तास वर्षा राऊतांची चौकशी झाली. सकाळी 11 वाजतापासून चौकशीला सुरुवात झाली होती. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Goregaon Patrachal land scam case) चौकशी करण्यात आली आहे. वर्षा राऊतांच्या खात्यातून व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. बँक खात्यासंदर्भातला जबाब नोंदवायचा होता. आज चौकशी संपली असली, तरी पुन्हा त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊतांकडून एक कोटी 60 लाख रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊतांच्या अकाउंटवर आले. वर्षा राऊतांच्या खात्यात एक कोटी 8 लाखांची रक्कम आली. ही रक्कम कोणी पाठविली याचाही शोध ईडीला घ्यायचा आहे.