Dharmendra : हि मॅन धर्मेंद्र यांची प्रकृती अजूनही चिंताजनक, मुलीने दिली नवी अपडेट
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची कालपासून अफवा पसरली आहे. मात्र, त्यांची मुलगी, अभिनेत्री ईशा देओल यांनी धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं म्हटलं आहे.
ईशा देओल यांनी मीडियातील वृत्ताचं खंडन करतानाच अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. मात्र, त्यांच्याबद्दलच्या खोट्या अफवा पसरवू नका, असं आवाहन ईशा यांनी केलं आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची बातमी कळताच देओल कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. तर अभिनेता गोविंदा, सलमान खान आणि अमिषा पटेल यांनीही रुग्णालयात येऊन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
