Pune Video : पुण्याच्या शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका, मराठा कार्यकर्ते आक्रमक, व्हिडीओ व्हायरल होताच…

Pune Video : पुण्याच्या शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका, मराठा कार्यकर्ते आक्रमक, व्हिडीओ व्हायरल होताच…

| Updated on: May 31, 2025 | 1:06 PM

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शिवसृष्टीच्या मुख्य गेटसमोर चारचाकी वाहन उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी एका राखाडी रंगाच्या गाडीजवळ एक वयस्कर व्यक्ती सूचना फलकावर लघुशंका करताना दिसत आहे, तर एक महिला मोबाईल हातात घेऊन तिथेच उभी असल्याचे दिसतंय.

पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या गेटवर एका व्यक्तीने लघुशंका केली या व्यक्तीचा लघुशंका करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचे नाव अमोल अरूण कुलकर्णी असे असल्याचे समोर येते तर अमोल कुलकर्णी याच्या पत्नीवरही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पुण्यातील या घटनेनंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेल्या स्मारकावरील सूचना फलकावर या व्यक्तीने लघुशंका केली.

Published on: May 31, 2025 01:05 PM