Ajit Pawar | ‘चहाला क्वालिटी हाय ना, आण बरं जरा…’ अजितदादांकडून चहा स्टॉलचं उद्घाटन

Ajit Pawar | ‘चहाला क्वालिटी हाय ना, आण बरं जरा…’ अजितदादांकडून चहा स्टॉलचं उद्घाटन

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 1:32 PM

अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असताना एका कार्यकर्त्यांन, 'माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा', अशी इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी टपरीचं उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहराची पाहणी करत असताना एका कार्यकर्त्याने ‘माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा,’ अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याच्या शब्दाला मान देत अजित पवारांनी टपरीच उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी ‘तू बनवलेला चहा कसाय?, चहाला क्वालिटी हाय ना?, आण बरं चहा’ असं म्हणत चहाची चवही घेतली.