प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणं बंद करा, Vikram Gokhale यांचे आवाहन

प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणं बंद करा, Vikram Gokhale यांचे आवाहन

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 12:36 AM

आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कल्याण : रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकाशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे. आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून हि अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक करत आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असे सांगितले.