Vijay Rupani : विजय रुपाणी यांचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव आज त्यांच्या कुटुंबाला सोपवण्यात आलं आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर डीएनए टेस्ट मॅच झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आलेलं आहे.
दरम्यान, या मोठ्या दुर्घटनेत आतापर्यंत ९७ जणांचे डीएनए जुळल्याची पुष्टी झाली आहे आणि ३५ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. रुपाणी हे याच विमानाने लंडनला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. मात्र टेकऑफ नंतर या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ते कोसळले होते. यात 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. मृतांची ओळख पटवण्यास अडचण येत असल्याने त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांचे डीएनए घेऊन ते मृतांशी जुळवल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात आहेत.
Published on: Jun 16, 2025 01:41 PM
