Vijay Shivtare : एकूण बजेटच्या 56 टक्के निधी 54 आमदार असलेल्या राष्ट्रवादीनं घेतला, विजय शिवतारेंचा हल्लाबोल

| Updated on: Jul 06, 2022 | 10:10 PM

एकूण बजेटच्या 56 टक्के निधी 54 आमदार असलेल्या राष्ट्रवादीनं घेतला, तर मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला (Shivsena) केवळ 16 टक्के निधी मिळाला, असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला.

Follow us on

मुंबई : शिवसेनेचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे देखील एकनाथ शिंदेच्या सोबत असून सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्याला न्याय देईल, अशी भावना शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेवर संधी देतील, अशी अपेक्षा आहे. विजय शिवतारे यांनी महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेचे आमदारांना फंड मिळत नसल्याची खंत देखील व्यक्त केली. एकूण बजेटच्या 56 टक्के निधी 54 आमदार असलेल्या राष्ट्रवादीनं घेतला, तर मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला (Shivsena) केवळ 16 टक्के निधी मिळाला, असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला. यादरम्यान काढण्यात आलेले जीआर रद्द करण्यात यावे, अशी मागणी करत त्याबद्दल पत्रदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.