Vilas Shinde : … म्हणून माझ्यावर कारवाई, ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी अन् डोळे पाणावले, बघा काय व्यक्त केली खंत?
आता नाशिकचे नवीन महानगर प्रमुख मामा राजवाडे असणार आहेत. विद्यमान महानगर प्रमुख विलास शिंदें याच्या नाराजी नाट्यानंतर विलास शिंदे यांना पदावरून हटवण्यात आले. विलास शिंदे रविवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय.
नाशिकच्या राजकारणातून एक बातमी येत आहे. विलास शिंदे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. तर विलास शिंदे यांच्या जागी आता मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर विलास शिंदे यांचे डोळे पाणावले असल्याचे पाहायला मिळाले.
टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना विलास शिंदे म्हणाले, माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई केली. 30 वर्ष मुलांकडे न बघता पक्षाचे काम केले. त्याच्या बदल्यात हे दिवस आले. माध्यमांशी बोललो म्हणून पदावरून हकालपट्टी केली, किती जणांची हकालपट्टी कराल? इतक्या वर्षाच्या कामाचे हे फळ असेल तर डोळे पाणावणारच ना. माझ्यापेक्षा अनुभवाने लहान असलेल्यांना जिल्हाप्रमुख केले. वसंत गीते यांनी सगळं मिळून सुद्धा अनेक पक्ष बदलले. संजय राऊत यांच्याकडे माझी नाराजी कळवली होती. नाशिकला आल्यावर बघू असं ते म्हणाले होते मात्र त्यापूर्वीच कारवाई केली, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आता पुढची भूमिका आज ठरवणार असल्याचेही विलास शिंदे यांनी म्हटले आहे.
