VIDEO : Pune | आनंदाच्या भरात गाडीच्या बोनेटवर बसून ‘तो’ व्हिडिओ केला, आता व्हायरल करु नका : नववधूची आई
स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना व्हिडीओ काढल्याने नववधूवर गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका”
स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना व्हिडीओ काढल्याने नववधूवर गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा करत आहेत. 23 वर्षीय वधूसह कारचालक, व्हिडीओग्राफर आणि गाडीतील इतर वऱ्हाड्यांवर पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बोनेटवर बसून लग्नाला निघालेल्या वधूचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
