Virat Kohli Retirement : … पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, स्वतः केली पोस्ट; नेमकं काय म्हणाला?

Virat Kohli Retirement : … पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, स्वतः केली पोस्ट; नेमकं काय म्हणाला?

| Updated on: May 12, 2025 | 1:23 PM

रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेट सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली यामुळे क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या काळात संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असल्याची माहिती मिळतेय.

भारतीय क्रिकेटला एका आठवड्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेट सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की कोहलीने बीसीसीआयला त्याच्या निवृत्तीची माहिती दिली होती, परंतु बीसीसीआयने त्याला आगामी इंग्लंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. असे असतानाही विराट कोहलीने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (७ मे) कर्णधार रोहित शर्मानेही कसोटी सान्यातून निवृत्ती घेतल्याने भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना आता विराट कोहलीच्या निर्णयाने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. एका आठवड्यात दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे चाहते नाराज झाले आहेत.

सोशल मीडियावर काय म्हणाला विराट?

Published on: May 12, 2025 01:20 PM