Walmik Karad : बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर

Walmik Karad : बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर

| Updated on: Jun 17, 2025 | 2:21 PM

Walmik Karad News : वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर बीडमध्ये झळकले होते. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

बीडमध्ये लावण्यात आलेले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर आता टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर हटवण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाप्पा साहेब घुगे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे फोटो काल झळकले होते.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये हत्या करण्यात आलेली होती. त्यांच्या निर्घृण हत्येत वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे देखील या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या बीड न्यायालयात सुरू आहे. त्यातच काल बीड शहरात वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर झळकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.

Published on: Jun 17, 2025 02:21 PM