मागे पडलेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ; लातूरकरांची चिंता कायम, धरणात फक्त इतकाच पाणीसाठा
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह मुंबई, मुंबई उपनगर आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली होती. ज्यामुळे अनेक धरणे आता भरण्याच्या स्थितीत तर काही धरेणे ही ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत.
लातूर, 01 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून सुरू असणारा पाऊस आता जरा कुठे थांबला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह मुंबई, मुंबई उपनगर आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली होती. ज्यामुळे अनेक धरणे आता भरण्याच्या स्थितीत तर काही धरेणे ही ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. मात्र अजूनही काही जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने धरणे भरलेली नाहीत. अशीच अवस्था सध्या लातूर जिल्ह्याची आहे. येथे पावसाने दडी मारली होती. पण गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने लातुरकरांची चिंता काहीअंशी कमी केलीय. गेल्या आठवड्यापुर्वी मांजरा धरणात २२ टक्के पाणी साठी होता. तो आता २७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यात संततदार पावसाने आठवडाभरात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
Published on: Aug 01, 2023 12:32 PM
