मुंबईकरांसाठी खास बातमी! मध्य मुंबईतील ”या” भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद; आज पाणी मिळणार का?

| Updated on: May 27, 2023 | 10:45 AM

दुरुस्तीच्या कारणास्तव पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे गळती शोधून दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. तरीही या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या जल विभागाने केले आहे.

Follow us on

मुंबई : दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ या परिसरात आजपासून ते रविवारी, 28 मे सकाळी 10 पर्यंत पाण्याची आणीबाणी राहणार आहे. तब्बल 26 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे गळती शोधून दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. तरीही या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या जल विभागाने केले आहे. दरम्यान, जी उत्तर विभाग संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात 27 मे रोजी. तर ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात 28 मे रोजी या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहिल.