मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नकोच; काय म्हणाले तायवाडे?

| Updated on: Sep 26, 2022 | 2:18 PM

आधीच आम्हाला आरक्षण कमी आहे. त्यात मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. त्याला आमचा बिलकूल विरोध नाही, असंही तायवाडे म्हणाले.

Follow us on

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर: राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (maratha reservation) प्रश्न ऐरणीवर आला आहे. ओबीसीतून (obc) मराठा समाजाला आरक्षण देण्याची मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. या मागणीचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (babanrao taywade) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही. या सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर उतरू, असा इशाराच बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. आधीच आम्हाला आरक्षण कमी आहे. त्यात मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. त्याला आमचा बिलकूल विरोध नाही, असंही तायवाडे म्हणाले.