Meenatai Thackeray Statue : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणारा उपेंद्र पावसकर नेमका कोण? गुन्हा कबुल करत म्हणाला, ठाकरे पिता-पूत्र हे…
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याच्या प्रकरणी उपेंद्र पावसकर याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने संपत्तीच्या वादात ठाकरे कुटुंबाचा हस्तक्षेप असल्याचा दावा केला आहे. श्रीधर पावसकर (बाळासाहेब ठाकरे यांचे माजी बॉडीगार्ड) यांच्या कुटुंबीयांनी मात्र उपेंद्र पावसकरला ओळखत नसल्याचे म्हटले आहे.
दादर येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्या प्रकरणी पोलिसांनी उपेंद्र पावसकर याला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ठाकरे कुटुंबातील एका कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याचे समजते. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्रांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. आरोपीने आदित्य ठाकरे आणि श्रीधर पावसकर यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. श्रीधर पावसकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे माजी बॉडीगार्ड होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी उपेंद्र पावसकरला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमने रंगांचे नमुने गोळा केले आहेत.
Published on: Sep 18, 2025 01:16 PM
