कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

| Updated on: Jan 19, 2026 | 2:07 PM

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निकालानंतर महायुतीला स्पष्ट मत मिळालं असलं तरी, भाजप आणि शिवसेनामध्ये स्वतःचा महापौर बसवण्यासाठी रस्सी खेच सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 112 नगरसेवक आहेत यापैकी 103 जागा ह्या महायुतीला मिळाल्या आहेत तर 19 जागा ह्या विरोधकांना मिळाल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निकालानंतर महायुतीला स्पष्ट मत मिळालं असलं तरी, भाजप आणि शिवसेनामध्ये स्वतःचा महापौर बसवण्यासाठी रस्सी खेच सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 112 नगरसेवक आहेत यापैकी 103 जागा ह्या महायुतीला मिळाल्या आहेत तर 19 जागा ह्या विरोधकांना मिळाल्या आहेत. यातील 50 नगरसेवक भाजपचे आणि 53 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. महापालिकेत महापौर बसवण्यासाठी भाजपला 12 नगरसेवकांची आवश्यकता आहे तर शिंदेंच्या सेनेला 09 नगरसेवकांची आवश्यकता आहे, त्यामुळे इतर पक्षातील काही नगरसेवक आपल्यात घेण्याची चिन्ह दिसत आहेत. ठाकरेंचे काही नगरसेवक हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय, तर मनसे देखील सेनेला पाठिंबा देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदेंच गणित पूर्ण होताना दिसतंय परंतु भाजपची अजूनही सायलेंट भूमिका असल्याचं दिसून येतंय. येणाऱ्या काळात नक्की कोणाचा महापौर बसेल? महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन अडीच- अडीच वर्ष महापौर वाटून घेतात की इतर पक्षातील काही नगरसेवक फोडून आपला स्वतःचा महापौर बसवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jan 19, 2026 02:07 PM