Chandrakant Patil | उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल

| Updated on: Nov 11, 2021 | 4:57 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्यांना सरकारी रुग्णालय चालत नाही, याचा अर्थ सरकारी रुग्णालयं चांगली नाहीत का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Follow us on

मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना एक छोटी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, ठाकरे कुटुंबीयांच्या निर्णयानंतरच शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले. काल संध्याकाळी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्या कोणत्याही चाचण्या करण्यता आल्या नाहीत. आज त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आजच संध्याकाळी येणार आहेत. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर रिपोर्ट तपासतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. वरिष्ठ डाँक्टरांचा एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठकरे हे कुटु़बींयांशी चर्चा करून घेतील अशी माहीती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात HN रिलायंन्स हाॉस्पिटल कोणतेही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्यांना सरकारी रुग्णालय चालत नाही, याचा अर्थ सरकारी रुग्णालयं चांगली नाहीत का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.