‘…नको मी पाया पडतो’, विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे अन् प्रवीण दरेकरांमध्ये काय झाला मिश्किल संवाद?
आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कालपासून १६ डिसेंबरपासून राज्यात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. महायुती सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून ते नागपूरात होत आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ईव्हीएमसह इतर काही मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे अन् प्रवीण दरेकर यांच्यामध्ये मिश्किल संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवन परिसरात प्रवीण दरेकर हे टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया देत असताना उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली. त्यावेळी त्यांनी मी बोलू का असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरेंनी प्रवीण दरेकर यांना विचारणा केली. यावर तर नको मी पाया पडतो, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना मिश्कील उत्तर दिलं आहे. बघा व्हिडीओ
