Rupali Patil : मी बीडमध्ये, आत्म्याने मारलं का? महिलेच्या हल्ल्याच्या आरोपांवर रुपाली पाटलांचे चोख प्रत्युत्तर
माधवी खंडाळकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे रुपाली पाटील यांच्यावर आरोप केला आहे. खंडाळकरांनी रुपाली पाटील यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्याची मागणी केली. रुपाली पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळत, आपण बीडमध्ये असल्याचे सांगितले.
फेसबुक लाईव्हद्वारे माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने रुपाली पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली पाटील यांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा दावा खंडाळकर यांनी केला असून, पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
माधवी खंडाळकर यांच्या म्हणण्यानुसार, रुपाली पाटील आणि त्यांच्या घरच्यांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आरोपांवर रुपाली पाटील यांनी मात्र तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “मी बीडमध्ये आहे, मग माझ्या आत्म्याने मारले का?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. पाटील यांनी सांगितले की, त्या बीडमधून पुण्याला येत आहेत. या घटनेमागील नेमके कारण किंवा वादाचा तपशील आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Oct 31, 2025 11:29 AM
