Mumbai Corona | मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी

| Updated on: Aug 13, 2021 | 8:27 AM

Coronavirus | 63 वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह होती. ही महिला फुप्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तसेच कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. शिवाय, ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Follow us on

मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मुंबईत डेल्टा प्लसचे 11 रूग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 63 वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह होती. ही महिला फुप्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तसेच कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. शिवाय, ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, या महिलेची 21 जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. 24 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, 27 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र, पालिकेकडे बुधवारी 11 ऑगस्ट रोजी ती महिला रूग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोव्हिड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर त्यांचा कोव्हिड अहवाल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला होता. जीनोम सिक्वेसिंग अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले आहे.