Kolhapur : वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., कोल्हापूरचा थरारक व्हिडीओ
Kolhapur News : धबधब्याखाली सेल्फी काढायला गेलेल्या एका तरुणाचा थरारक व्हिडीओ कोल्हापूरमधून समोर आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. याच धबधब्या सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण वाहून जाताना थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे.
राधानगरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याचा प्रवाह सुद्धा मोठा झाला आहे. सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या पसंतीस पडला आहे. मुसळधार पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील सुद्धा इतर धबधबे प्रवाहित झाल्याने गर्दी वाढली आहे. अशातच राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात तो पाय घसरून प्रवाहात वाहून जात होता. यावेळी इतर दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवलं आहे.
Published on: Jun 22, 2025 05:53 PM
