Phaltan Doctor Death : डॉक्टर महिला आत्महत्येचं प्रकरण तापलं, CM फडणवीस राजीनामा द्या, थेट दिल्लीतून मागणी
फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीत युवा काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. पोलिसांवर आरोपींना वाचवल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाच रायसीना रोडवरील युवक काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी “न्याय द्या, न्याय द्या, डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या” अशा घोषणा देत महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, पोलिसांवर आरोपींना वाचवण्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो अयशस्वी केला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना बॅरिकेडिंगवर न चढण्याचे आणि कलम लागू असल्याने आंदोलन न करण्याचे आवाहन केले.
Published on: Oct 28, 2025 04:35 PM
