Nashik News : धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू?
नाशिकच्या फुलेनगर भागात डीजेच्या आवाजाने एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा संशय आहे. काल रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. नितीश रणशिंगे असं या मृत तरुणाचं नाव आहे. मिरवणुकीत डीजेजवळ असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली. नितीशच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नाशिकच्या फुलेनगर परिसरात काल रात्री हा संपूर्ण प्रकार घडला आहे. नितीश एका डीजेजवळ उभा होता. त्यावेळी आवाजाने त्याच्या नाकातोंडातून अचानक रक्त निघायला सुरुवात झाली. या तरुणाला इतर देखील काही आजार असल्याच वैद्यकीय तपासातून समोर आलेल आहे. मात्र एकूणच या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे.
Published on: Apr 14, 2025 01:31 PM
