नागपूरच्या पोट्ट्याची कमाल, भंगार वापरुन बनवली रेसिंग कार

नागपूरच्या एका रँचोने जुगाड तंत्र आणि भंगार वस्तूंचा वापर करत आपलं स्वप्न पूर्ण करत चक्क रेसिंग कार बनवली आहे. ही कार सध्या नागपुरात चर्चेचा विषय बनली आहे.

Jan 29, 2022 | 1:48 PM
सुनील ढगे

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 29, 2022 | 1:48 PM

नागपुरातील स्वप्नील चोपकर या तरुणाने रेसिंग कार बनवली आहे. हा तरुण बी. कॉम. करतोय. मात्र त्याला गाड्या आवडतात. त्याच्या या आवडीमुळे तो गॅरेजमध्ये काम करून मेकॅनिकचं काम शिकला आणि मग तो आपल्या स्वप्नातील फॉर्म्युला वन रेसिंग कार बनवू लागला. त्यानंतर 9 महिने मेहनत घेऊन त्याने एक शानदार कार साकारली. (प्रातिनिधिक फोटो)

1 / 5
पैसे नसल्याने स्वप्नीलला महागड्या वस्तू वापरता आल्या नाहीत. मात्र त्याने जुगाड तंत्राचा वापर करत भंगारातील साहित्याचा वापर करून गाडीचे पार्ट्स बनवले.

2 / 5
या कारमध्ये स्वप्निलने मारुती 800 मधलं 800 सीसी क्षमतेचं इंजिन बसवलं आहे. ही कार फॉरम्युला वन कार दिसायला हवी, त्याप्रमाणे त्याने गाडीचे पार्ट्स बनवले.

3 / 5
ही कार बनवायला स्वप्नीलला 9 महिने लागले. दोन वेळा त्याची ट्रायल फेल झाली. मात्र खचून न जाता त्याने आणखी परिश्रम घेतले आणि आता त्याची गाडी धावू लागली आहे.

4 / 5
ही गाडी ताशी 90KM च्या स्पीडने धावते. जुगाड तंत्र वापरुन बनलेली ही कार आता नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें