Gold Price Today : ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 9,000 रुपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर

अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.

Gold Price Today : ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 9,000 रुपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात 12 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती घसरल्याचं दिसून आलं आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिलच्या सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी घसरून 47,475 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर मार्च महिन्यातील चांदीचा भाव 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 68,600 रुपये प्रतिकिलोवर आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. (gold price today multi commodity exchange down by 9000 from record high here is todays gold rate)

पहिल्या सत्रात सोनं 1 टक्क्यांनी आणि चांदी 0.33 टक्क्यांनी घसरली. अशाप्रकारे, सोने आतापर्यंत सुमारे 9,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे,  ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपये होते, ते आता 47,475 रुपयांपर्यंत घसरलंय, म्हणजेच जवळपास 8 महिन्यात सोने 9 हजारांनी स्वस्त झालंय.

याआधीही अमेरिकेतील रोजगाराच्या मुद्द्यावरून सोन्या चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली होती. एप्रिलमध्ये सोन्याचे वायदा प्रति औंस 1,826.80 डॉलर होता. तर मार्च महिन्यात चांदीचा वायदा दर औंस 27.04 डॉलर होता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold price today multi commodity exchange down by 9000 from record high here is todays gold rate)

संबंधित बातम्या – 

Special Report : दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तोळ्याचा भाव

Gold/Silver Rate Today: सोन्याचे नवे दर जारी, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Petrol Price : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातले दर

कमी पैशात सोप्या पद्धतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दिवसाला कमवाल 4000 रुपये

(gold price today multi commodity exchange down by 9000 from record high here is todays gold rate)

Published On - 1:29 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI