जालना महानगरपालिका निवडणूक 2026
जालना महापालिका
जालना महापालिका निवडणुकीसाठी 16 प्रभागात 65 जागांसाठी मतदान होणार आहे. जालना महापालिकेत एकूण 2 लाख 45 हजार 929 मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 28 हजार 894, महिला मतदार 1 लाख 17 हजार एक तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 34 आहे. जालना महापालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे या महापालिकेत कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जालना महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
जालना महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) जालना महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- जालना महापालिकेत एकूण 16 प्रभाग आहेत.
2) जालना महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- जालना महापालिकेवर एकूण 65 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) जालना महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- जालना महापालिकेत एकूण 2 लाख 45 हजार 929 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 28 हजार 894 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 17 हजार एक इतकी आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं! राज ठाकरे यांची थेट अजितदादांशी युती
जालना महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक युती केली आहे. महाराष्ट्रात आंबेडकर, ठाकरे आणि पवार घराणे प्रथमच एकत्र निवडणूक लढवत आहेत. ही जालना पालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष लागले असून, स्थानिक राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 30, 2025
- 6:59 PM