AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्या-ज्योतिकाची हटके लव्ह-स्टोरी; साधेपणानं जिंकतात प्रेक्षकांची मनं

सूर्या शिवकुमार आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोन्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय नावं आहेत. 1999 मध्ये 'पूर्वेल्लम केत्तुप्पर' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर शूटिंगनिमित्त दोघांची एकमेकांशी भेट होत राहिली. हळूहळू दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

| Updated on: Oct 19, 2023 | 12:25 PM
Share
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्योतिकाने नुकताच तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला. ज्योतिका तिच्या दमदार अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तिची लव्ह-स्टोरी अत्यंत साधी आहे. साऊथ सुपरस्टार सूर्यासोबत तिने 2006 मध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

1 / 5
ज्योतिकाने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयीचा किस्सा सांगितला. "सूर्याशी लग्न करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे तो माझा खूप आदर करतो. आम्ही 'पुवेल्लम केट्टुप्पर' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी त्याचं वागणं मला खूप भावलं होतं. त्यानंतर आम्ही सोबत सात चित्रपटांमध्ये काम केलं", असं तिने सांगितलं.

2 / 5
लग्नाविषयी ज्योतिका पुढे म्हणाली, "जेव्हा दिग्दर्शक एखादा रोमँटिक सीन करायला सांगायचे, तेव्हा सूर्याने कधीच त्या गोष्टीचा चुकीचा फायदा घेतला नाही. फक्त माझ्यासाठीच नाही तर इतर कोणत्याही अभिनेत्रीसाठी त्याचे असेच विचार आहेत. म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडले."

3 / 5
"मी दहा वर्षांपर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शूटिंगसाठी वेळ दिला. यामुळे मी खूप दमले होते. मला जितका पैसा कमवायचा होता, तितका मी कमावला. म्हणून ज्यावेळी मला सूर्याने लग्नासाठी प्रपोज केलं, तेव्हा मी फार काही विचार केला नाही. थेट प्रपोजलच्या दुसऱ्या महिन्यात लग्न केलं", असं ज्योतिका म्हणाली.

4 / 5
सूर्याची प्रशंसा करताना ज्योतिका पुढे म्हणाली, "तो जितका चांगला पती आहे, तितकाच चांगला तो पितासुद्धा आहे. तो त्याच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडतो. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तो काहीच विसरला नाही. त्याला सर्वकाही लक्षात आहे."

5 / 5
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?