Kundali Bhagya : कोण आहे श्रद्धा आर्या?, कुंडली भाग्य मालिकेनं दिली खास ओळख…

टीव्हीची लोकप्रिय सून श्रद्धा आर्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. (Who is Shraddha Arya?, Special identity given by Kundali Bhagya serial..)

1/5
shraddha arya
टीव्हीची लोकप्रिय सून श्रद्धा आर्या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते त्यानंतर ती जास्त चर्चेत आली. एकीकडे श्रद्धाचे चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे असेही काही लोक आहेत जे तिला ट्रोल करत आहेत. मात्र, श्रद्धा ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही आणि तिच्या आयुष्यात आनंदी आहे.
2/5
सध्या तुम्ही प्रसिद्ध टीव्ही शो कुंडली भाग्यमध्ये डॉ. प्रीता अरोराच्या रुपात तिला पाहत आहात. श्रद्धा 2017 पासून प्रीताची भूमिका साकारत आहे आणि तिचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. टीआरपी रेटिंगमध्ये दर आठवड्यात तिचा शो टॉप 5 वर येतो यावरून प्रीताच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
3/5
shraddha arya
एक काळ असा होता जेव्हा श्रद्धानं खूप संघर्ष केला होता आणि कोणीही तिला विचारलं नाही. मात्र आता श्रद्धा त्या टप्प्यावर आहे, जिथून ती केवळ प्रगतीचा मार्गावर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की श्रद्धा टीव्ही इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांना एका एपिसोडसाठी मोठी रक्कम दिली जाते. श्रद्धा कुंडली भाग्याच्या एका भागासाठी सुमारे एक लाख रुपये घेते.
4/5
shraddha arya
इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोजमध्ये सहभागी म्हणून काम करणारी श्रद्धा आज टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, मात्र तिला कुंडली भाग्यमधून अधिक यश मिळालं.
5/5
shraddha arya
श्रद्धा आर्या तिच्या लव्ह लाईफबद्दलही बरीच चर्चेत राहिली आहे. ती एका व्यावसायिकाला डेट करत होती. या व्यावसायिकाबरोबरच तिनं नच बलिये रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. अहवालानुसार आता दोघांचेही संबंध तुटले आहेत, अशी चर्चा आहे.