PHOTO | जगातील विचित्र घरे : काही 2000 वर्ष जुन्या झाडापासून बनलेत, काही पाण्याच्या मध्यभागी दगडावर आहेत उभी, फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

या जगातील प्रत्येक व्यक्तीला आपले घर सर्वोत्तम बनवायचे आहे. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना आपले घर अनोखे बनवण्याची आवड आहे.

1/5
PHOTO | जगातील विचित्र घरे : काही 2000 वर्ष जुन्या झाडापासून बनलेत, काही पाण्याच्या मध्यभागी दगडावर आहेत उभी, फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल
2/5
दगडांनी बनविलेले हे घर खूप विचित्र आहे. हे 'हाऊस ऑफ स्टोन्स' किंवा 'बोल्डर हाऊस' किंवा 'कासा डो पेनेडो' म्हणून ओळखले जाते. हे घर पोर्तुगालमध्ये असून ते 1974 मध्ये बांधले गेले. या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आत एक स्विमिंग पूल आहे, जे दगड घासून बनविले आहे.

3/5
पाण्याच्या मध्यभागी असलेले हे छोटे परंतु सुंदर घर सर्बियात आहे. चारही बाजूंनी जंगल आणि पाण्याने वेढलेले हे घर खूपच सुंदर दिसत आहे. असे म्हणतात की हे घर बांधून जवळ जवळ 50 वर्षे झाली आहेत. या घरापर्यंत जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे बोटीद्वारे. पोहून जरी येथे पोहोचता येत असले तरी हे धोकादायक देखील ठरु शकते.

4/5
हे घर 'वन लॉग हाऊस' म्हणून ओळखले जाते. अमेरिकेतील हे घर 2000 वर्ष जुन्या झाडाच्या खोडात बांधले गेले आहे. याच्या आत एक 13 फूट लांब जागा आहे, ज्यामध्ये एक शयनकक्ष बनविला गेला आहे आणि आवश्यक असलेल्या सर्व वस्तू या घरात आहेत.

5/5
ही विचित्र दिसणारी घरे तुर्कीमध्ये आहेट. ही विशेष आहेत कारण ती ज्वालामुखीच्या राखेपासून बनलेले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते लाखो वर्षांपूर्वी या भागाभोवती ज्वालामुखीचा स्फोट झाला होता आणि त्याचा लावा संपूर्ण भागात पसरला होता. यामुळे काही ठिकाणी उंच पर्वत देखील तयार झाले आणि लोकांनी या पर्वतांमध्ये आपली घरे बनविली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI