State Budget Session 2025 : 6 हजार 585 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

State Budget Session 2025 : 6 हजार 585 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

| Updated on: Mar 07, 2025 | 11:02 PM

Supplementary Demands Tabled : राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात 6 हजार 586 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवर भाष्य केलं जाणार आहे. विरोधी पक्षाकडून देखील आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी पक्षांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं समजत आहे. अधिवेशनात 10 मार्चला राज्याचे अर्थमंत्री तसंच मुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 6 हजार 586 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहे. त्यापैकी 931 कोटींच्या अनिवार्य मागण्या आहेत. तर 3 हजार 133 कोटींच्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठीच्या मागण्या आहेत. या 6 हजार 586 कोटी रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 4 हजार 245 कोटींचा आहे.

Published on: Mar 03, 2025 01:41 PM