CM Devendra Fadnavis : खंडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

CM Devendra Fadnavis : खंडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

| Edited By: | Updated on: Mar 02, 2025 | 2:41 PM

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे टावळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे.

एकनाथ खडसे यांच्या नातीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. इतरांना देखील अटक होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आरोपींना माफी देता कामा नये, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेट.

जळगावमधील मुक्ताईनगरच्या यात्रेच्या ठिकाणी काही टावळखोरांनी नेते एकनाथ खडसे यांची नात आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांच्या नातीची छेड काढणारे टावळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे होते. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आरोपी टवाळखोरांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. इतरांना देखील लवकरच अटक होईल, असं फडणवीस म्हणाले.

Published on: Mar 02, 2025 02:41 PM