Pune Crime News : कॅब चालकाने केले अश्लील चाळे, तरुणीने चालत्या कॅबमधून घेतली उडी; पुढे जे झालं ते ..
Cab Driver Molest Girl In Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी महिलेवर अत्याचाराची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुण्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पुण्यात स्वारगेट परिसरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून दुसरी अत्याचाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका आयटी कंपनीतील तरुणीचा कॅब चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात सलग दुसऱ्यादिवशी महिलेवर झालेल्या अत्याचाराने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता एका कॅब चालकाने आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान कॅब चालकाने आरशात पाहून विकृत चाळे केले. चालकाने अश्लील कृत्य केल्याने या तरुणीने चालत्या कॅबमधून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर 2 किलोमीटर धावत जाऊन ही पीडित तरुणी पोलीस ठाण्यात दाखल झाली. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसंच कॅब चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
