ना गाड्या, ना रस्ते, सौदी अरब नवं शहर उभारणार, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची घोषणा

| Updated on: Jan 13, 2021 | 9:46 AM
सौदी अरब (Saudi Arab) एक असं शहर वसवणार आहे, ज्या शहरात रस्ते नसतील, वाहने नसतील. या शहात कोणत्याही प्रकारचे कार्बन उत्सर्जन होणार नाही. या शहरातले लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतील. सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Crown Prince Mohammad Bin Salman) यांनी हे शहर उभारण्याची घोषणा केली आहे. पुढील काही महिन्यात हे शहर उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

1 / 4
क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2017 मध्ये निओम प्रोजेक्टची (Neom Project) घोषणा केली होती. सौदी अरब हा जगातला सर्वात मोठा तेल निर्यात करणारा देश आहे. त्यांची अर्थव्यवस्था तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. परंतु प्रिन्स मोहम्मद यांचं ध्येय आहे की, पुढील काळात त्यांचा देश केवळ तेलावर अवलंबून राहायला नको. इतरही क्षेत्रांमध्ये त्यांचा वर्चस्व असायला हवं. निओम प्रोजेक्ट त्याचाच एक लहानसा भाग आहे.

2 / 4
सौदी अरबमधील हे नवं शहर तब्बल 170 किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं असेल. या शहराचं नाव द लाईन (The Line) असं असेल. हे शहर निओम प्रोजेक्टचा (Neom) एक भाग असेल. सौदी अरब निओम प्रोजेक्टवर 500 बिलियन अमेरीकन डॉलर्स इतका खर्च करत आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या शहराच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात होईल, असे बोलले जात आहे.

3 / 4
द लाईन या शहरात तब्बल 10 लाख लोक राहतील. 2030 पर्यंत या शहरात 3 लाख 80 हजार रोजगार तयार होतील. शहराच्या आधारभूत संरचनेचा निर्मिती खर्च म्हणून सौदी अरब 100 ते 200 बिलियन अमेरीकन डॉलर्स खर्च करणार आहे. सौदी अरबने या नव्या शहराबाबत म्हटले आहे की, या नव्या शहरात कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) होणार नाही.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.