Maharashtra Breaking News LIVE : अवघ्या 24 तासात 2 गोळीबाराच्या घटनांमुळे खळबळ
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर लोकांवर गुन्हा दाखल होणार. ताडपत्री टाकल्याने कबुतर रस्त्यावर आले. जैन समाज आणि पक्षप्रेमी रस्त्यावर उतरत कबुतरांना रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू केलं. तर कबूतर खाना पुन्हा सुरु करा… अशी मागणी करत स्थानिकांच्या डोळ्यात पाणी आलं. पावसामुळे बाजारात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या कमी झाली होती.. त्यामुळे भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. रविवारी मार्केट बाजारात 90 ट्रक फळभाज्या दाखल झाल्या आहेत. कोथिंबिरीच्या दरात किंचित वाढ, तर मेथीच्या भावात घट झाल्याचे चित्र दिसत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष न्यायालयात 11वी सुनावणी. आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय येणार. वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता. वाल्मीक कराड सोडता इतर सर्व आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार. विशेष सरकारी वकील उज्वल निकम येणार नसल्याची माहिती. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
अवघ्या 24 तासात 2 गोळीबाराच्या घटनांमुळे खळबळ
अवघ्या 24 तासात 2 गोळीबाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. पुण्याजवळील कोल्हेवाडीत हवेत गोळीबार करण्यात आला. दुचाकीला कट मारल्याच्या रागातून वाद झाला. या वादातून एकाने देशी बनावटीचे पिस्तूल काढत हवेत गोळीबार केला. कोल्हेवाडी परिसरात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलं तर पसार झालेल्या आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
-
3 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना
सिंहगड रोड नांदेड सिटीमध्ये एका ठिकाणी काम सुरू असताना 3 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पीएमआरडीए, अग्निशमन दल तसेच एनपीडीआरएफने घटनास्थळी धाव घेतली. या 3 पैकी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
-
उद्या सकाळी एनडीए संसदीय पक्षाची बैठक
उद्या सकाळी 9:30 वाजता एनडीए संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी त्यात भाषण करतील. पावसाळी अधिवेशनातील ही पहिलीच बैठक असेल ज्यामध्ये एनडीएचे सर्व खासदार उपस्थित राहतील. यामध्ये ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला जाईल.
-
नाशिकमध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
नाशिकमध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी संभाजी ब्रिगेडने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त केला आहे. संत तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते. व्याख्यानाच्या ठिकाणी माध्यमांनाही प्रवेश नाही.
-
बीड : महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाला वेग
बीड जिल्ह्यातील परळी येथे घडलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एसआयटी पथकाकडून घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा करण्यात आला. एसआयटी प्रमुख पंकज कुमावत महादेव मुंडे यांची हत्या झाली त्या ठिकाणी पोहोचले आहे. घटनास्थळाची पाहणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
-
-
फारुख अब्दुल्ला यांचे मोठे विधान
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ज्यांना असे वाटते की दहशतवाद संपेल, मी त्यांना आव्हान देतो की जोपर्यंत आपल्या शेजाऱ्यांची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही.
-
सोलापूर: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कौतुक
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असं जानकर यांनी माळशिरस येथील होलार समाजाच्या मेळाव्यात म्हटलं आहे.
-
जळगाव: देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदुबाई वसंत मराठे असे 69 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. इंदुबाई या त्यांच्या शेतात निंदनीचे काम करत बिबट्यांने अचानक हल्ला केला, यात जागीच त्यांचा मृत्यू झाला
-
सोलापूर: संजय शिरसाट यांची मोठी घोषणा
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी होलार समाजाच्या मेळाव्यात मोठी घोषणा केली आहे. होलार समाजाच्या महामंडळासाठी मी तातडीने 50 कोटीची तरतूद करतो असं शिरसाट यांनी माळशिरस येथील होलार समाजाच्या मेळाव्यात म्हटलं आहे.
-
बदलापूर: ओसामा शेख याला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक
बदलापुरमधील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या ओसामा शेख याला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. उत्तर प्रदेश मधील दहशतवादी कारवाईत संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ओसामाला आता उत्तर प्रदेशला नेण्यात आलं आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांचा सलग चार दिवस दौरा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सलग चार दिवस दौरा
धाराशिव, सोलापूर, हैदराबाद, लातूर असा असणार मनोज जरांगे पाटील यांचा दौरा
दिनांक 5 ऑगस्ट रोजी मंगळवार सकाळी 10 पासून धाराशिव येथे दिवसभर गाठी भेटी
दिनांक 6 बुधवार सकाळी 10 वाजता सोलापूर येथे दिवसभर गाठी भेटी
सात ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचा तेलंगणा दौरा
-
विटा येथे वकिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
सांगलीच्या विटा येथे वकिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. शहरातील एका वकिलावर विटा पोलीसांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा न्यायालयातील वकिलांनी एकत्रित येत, विटा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. हाताला काळ्या फित बांधून विटा पोलिसांचा निषेध देखील यावेळी नोंदवण्यात आला आहे.
-
ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा, एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश
ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश
सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा
खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
-
राष्ट्रवादीच्या बॅनरवर आमदार धनंजय मुंडेंचा फोटो नाही
भाजपाचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा 7 तारखेला बीडच्या वडवणी मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्थानिक नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान बीडमध्ये लागलेल्या बॅनरवर इतर सर्व नेत्यांचे फोटो आहेत मात्र आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
-
कोथरूडमध्ये मुलींना मारहाण
कोथरूडमध्ये मुलींना मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार झाल्यानंतर या मुलींनी स्वतः जाऊन ससून रुग्णालयात तपासणी केली आहे. या अहवालात या मुलींना कोणताही fresh injury नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पुणे पोलीस ससून रुग्णालय प्रशासनाकडून या मुलींच्या तपासणीचा अहवाल मागवणार असल्याची पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली.
-
कल्याणमध्ये धावत्या मेलमध्ये ‘फटका गँग’चा हैदोस!
आंबिवली शहाड दरम्यान धावत्या मेल मधील प्रवासाच्या हातावर फटका मारून खाली पाडून प्रवाशाची लुटपाठ प्रकरण समोर आले आहे. या घटनेत जखमी गौरव निकमला पाय गमवावा लागला आहे. या प्रकरणात कल्याण जीआरपी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
-
मोठा निर्णय होणार! मनसेचा मविआत समावेश होण्याच्या चर्चांना उधाण
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. याच कारणामुळे राजकीय पक्ष आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे स्थानिक नेतेदेखील आपली राजकीय सोय ओळखून पक्षांतर करत आहेत. राज्यात लवकरच मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पट बदलणार आहे. हीच बाब लक्षात घेता आता महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
-
जळगावच्या एरंडोल तालुक्यात, पाथरखेडा आश्रम शाळेत गोवरची लागण झालेल्या 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
एरंडोल तालुक्यातील पाथरखेडा आश्रम शाळेतील 42 विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होतं. 32 विद्यार्थ्यांना उपचारांनंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून 10 विद्यार्थी रुग्णालयात अजूनही दाखल आहेत. त्यापैकी चार विद्यार्थी अतिदक्षता विभागात आहेत.
-
पेटीएमवर अनाऊंसमेंट मराठीत केली जावी; आरपीआय आठवले गटाचे आंदोलन
आरपीआयचं पेटीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पेटीमने मराठी भाषा वापरण्याची मागणी केली आहे. पेटीएमवर अनाऊंसमेंट मराठीत केली जावी अशी मागणी आता आरपीआय रामदास आठवले गटाचे कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. जेव्हा पेटीएमवर पेमेंट केलं जातं तेव्हा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये माहिती मिळते जी मराठी भाषेत करावी असं त्यांचं म्हणणं आहे.
-
अंतरजातीय विवाहाला नातेवाईकांचा विरोध; पतीला मारहाण करत पत्नीचं जबरदस्तीने अपहरण
अंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला मारहाण करत पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. सध्या पोलिसांच्या पाच टीम मुलीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या असून, पीडित मुलीच्या जिवाला कोणताही धोका नाही, अशी माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
-
शिवसेनेचा बाप मीच म्हणाऱ्या भाजप आमदार फुकेंनी माफी मागावी; शिंदेंच्या शिवसेनेची मागणी
शिवसेनेचा बाप मीच असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार फुकेंनी माफी मागावी असं शिंदेंच्या शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. आमदार परिणय फुके यांनी केलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
-
शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
शिवसेनेचा बाप मीच, असं वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रकरणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देऊ, असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेने दिला आहे.
-
कल्याण न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
2007 मध्ये कल्याण पूर्वेत झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वंडार पाटील यांच्या मुलगा विजय पाटील हत्या प्रकरणात तीन आरोपींवर हत्त्येचा आरोप तर दहा जणांची निर्दोष सुटका केली. कल्याण न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय.
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह तेरा जणांवर 18 वर्षापासून न्यायलाच सुनावणी सुरू होती.
-
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील आश्रम शाळेत गोवरची लागण झालेल्या चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, अतीदक्षता विभागात दाखल
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पाथरखेडा आश्रम शाळेत गोवरची लागण झालेल्या चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.
एरंडोल तालुक्यातील पाथरखेडा आश्रम शाळेतील 42 विद्यार्थ्यांना, 24 जुलै रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते
32 विद्यार्थ्यांना उपचारांनंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून 10 विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी चार विद्यार्थी अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर आहेत
-
अमरावती – महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात हॉकर्स संघटनेचा हातात नकली बंदूक मोर्चा
अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात हॉकर्स संघटनेने हातात नकली बंदूक घेऊन महानगरपालिका विरोधात मोर्चा काढला.
मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांवर महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे. या विरोधात आता अमरावती शहरातील हजारो छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत.
-
राज ठाकरे-बच्चू कडू यांची होणार भेट
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यात सहा ऑगस्टला होणार भेट. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलना संदर्भात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात भेट. विश्वसनीय सूत्रांची टीव्ही नाईन मराठीला माहिती. या आधीही बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी दिला आहे पाठिंबा..
-
मुंबई-गोवा हायवे महामार्गावर लोखंडी सळी पडली विद्यार्थ्यांवर
मुंबई-गोवा हायवे महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना लोखंडी सळी पडली विद्यार्थ्यांवर. विद्यार्थी जखमी, विद्यार्थ्याला उपचारासाठी हॉस्पिटलला हलवले. पोलिसांशी शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांची बाचाबाची.
-
मुंबईच्या मदनपुरा भागात एक इमारत कोसळली
मुंबईच्या मदनपुरा भागात एक इमारत कोसळली. इमारत फार जुनी होती. या दुर्घटनेत कोणी जखमी झालेलं नाही.
-
भाजपकडून आगामी महापालिका निवडणुका संदर्भात बैठक
भाजपकडून आगामी महापालिका निवडणुका संदर्भात बैठक. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन. दादरमधील वसंत स्मृती येथे बैठकीला सुरुवात. भाजप नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, विद्या ठाकूर, योगेश सागर, अतुल भातखळकर उपस्थित. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा पार पडला तर दुसरीकडे भाजपकडून सर्व विभागीय कमिटीची बैठक सुरू.
-
ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती कधी? राज ठाकरेंच महत्त्वाच वक्तव्य
“मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा. स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करा. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीवर योग्यवेळी बोलेन. आदेशाची वाट पहा” पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांचं वक्तव्य
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मनोज चौधरी यांचा भाजपात प्रवेश
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मनोज चौधरी यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दोन वेळा नगरसेवक राहिलेल्या मनोज चौधरी यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व माजी जिल्हा परिषद सदस्यांनी मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
-
मुंबईतील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांना जीवरक्षकांनी वाचवलं
मुंबईतील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांना जीवरक्षकांनी बुडण्यापासून वाचवलं. अंकित आत्माराम सूर्यवंशी, वय १४ वर्षे आणि विशाल संतोष अहिरे, वय १४ वर्षे, हे दोघेही तरुण मालाडमधील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यानंतर ते अचानक बुडू लागले. तिथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकाने दोघांनाही सुखरूप वाचवलं. दोन्ही तरुण मालाड पूर्वेतील पठाणवाडी येथील रहिवासी आहेत.
-
दादरचा कबूतरखाना महापालिकेने ताडपत्री टाकून केला बंद
दादरचा कबूतरखाना महापालिकेनं ताडपत्री टाकून बंद केला आहे. त्यामुळे सकाळपासून कबूतर या ताडपत्रीवर आणि रस्त्यावर येत असल्याने दोन कबुतरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक जैन नागरिक आणि पक्षी प्रेमी आज सकाळपासून रस्त्यावर कबुतरांना इजा होऊ नये यासाठी कबुतरांना हटवण्याचं काम करत होते. मात्र सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात कबूतर रस्त्यावर आल्याने दोन कबूतर हे गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.
-
कोथरूड पोलीस चौकी छळ प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली पोलिसांची बाजू
पुण्यातील कोथरूड पोलीस चौकी छळ प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या बाजूने उडी घेतली आहे. संबंधित घटनेचा कोणताही सबळ पुरावा नसताना पोलीस अधिकाऱ्यांवरच अॅट्रासिटी कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यासाठी सोशल मीडियातून दबाव टाकणे चुकीचे आहे, असं त्यांनी म्हटले आहे. अशा आशयाचं पत्रच हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडे आणि डॉ. निवेदिता एकबोटे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.
-
मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा
मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या मध्य रेल्वेवरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पहाटे नऊच्या सुमारास एक्सप्रेस गाडी तांत्रिक बिघाडामुळे कल्याण रेल्वे स्थानक दरम्यान थांबल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण ते सीएसटी लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहेत. याबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून एक्सप्रेस गाडी त्वरित मार्गी लावण्यात आली असली तरी तांत्रिक कारणामुळे लोकल वेळेवर धावत नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
-
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीच्या आक्रोशाला नाटकी म्हणणं हा अपमान, बच्चू कडूंनी सुनावले
आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे बच्चू कडू म्हणाले. मंत्रिपद मिळाल्यामुळे बावनकुळे यांचे पोट भरले असले, तरी त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्यांच्या पत्नींचा आक्रोश रस्त्यावर येत असेल, तर त्याला नाटकी म्हणणे हा अपमान आहे, असे विधान बच्चू कडू यांनी केले.
-
जळगावात बिबट्याच्या मादीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, परिसरात चिंतेचे वातावरण
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या गोदरी येथील कांग धरण परिसरात एका बिबट्याच्या मादीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी याबद्दल वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृत बिबट्याची मादी सहा वर्षांहून अधिक वयाची असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वन विभागाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल, असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
-
बीडच्या रामेश्वर धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र रामेश्वर सौताडा येथे एक दुःखद घटना घडली आहे. बहादुरपूर येथील शंकर कोळेकर (वय अंदाजे २५) या तरुणाचा रामेश्वर धबधब्यात बुडून मृत्यू झाला. तो आपल्या मित्रांसोबत देवदर्शनासाठी गेला होता. देवदर्शन झाल्यानंतर सर्व मित्र धबधब्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून शंकरचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
संजय राऊत यांची दुबेंवर टीका
अनेक दुबे आले गेले मुंबई अखंड आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
दुबे यांचे परत एकदा वादग्रस्त विधान
बीएमसी निवडणुका आल्या की, शिवसेना आणि मनसे राजकारण करत असल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.
-
राज्यातील 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला. मात्र, अजूनही म्हणावा तसा पाऊस होताना दिसत नाहीये.
-
दादरचा कबूतर खाना तात्पुरता बंद
दादरचा कबूतर खाना तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई महापालिकेने केली आहे
-
दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने भीमाशंकर येथे भाविकांची गर्दी
रात्रीचे दर्शन बंद असल्याने रात्री 12 वाजल्यापासून दर्शनबारीत भाविकांच्या रांगा…. दर्शन बारी रांगेत बसण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांची गैरसोय… अनेक भाविकांना ताटकळत ओल्यावर बसण्याची वेळ…
-
कसारा ते कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा गोंधळ
कसारा लोकलमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या ग्रुप साठी सीट राखीव ठेवण्यासाठी चाकरमान्यांची दादागिरी… पहाटे 6:10 वाजताच्या कसाऱ्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये दादागिरीचा प्रकार… एका सीटवर स्वतः बसून उरलेल्या दोन सीट्सवर बॅगा ठेवत आमचा माणूस येणार आहे दोन्हीही सीट आमच्या आहेत” कोणी बसू नये आम्ही रोज असंच करतो तुम्हाला जे करायचा आहे करा असे सांगत इतर प्रवाशांना बसण्यास मज्जाव… संत झालेल्या इतर प्रवाशांनी व्हिडिओ काढत ही जागा आम्हाला हवी असे सांगत ट्रेनमध्ये घातला गोंधळ… दररोज एकाच ट्रेनमध्ये एका डब्यातून प्रवास करणाऱ्या चाकरमाण्यांच्या अशा ‘गटबाजी’मुळे प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्याची वेळ..
-
राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता
सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली… नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी वेधशाळेने पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. आयएमडीच्या नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत आणि मासिक पाऊस आणि तापमानाचा अंदाज या दीर्घकालीन अंदाजानुसार ऑगस्ट – सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता… आयएमडीने दिलेल्या संभाव्य अंदाज नकाशांनुसार सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता…
-
खडकवासलातून मुठा नदीत सोडलेले पाणी केले बंद
धरणसाखळीतील पावसाचा जोर ओसरल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला १ हजार ६७० क्यूसेक पाण्याचा विसर्ग पूर्णपणे करण्यात आला बंद… शहरातील संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला आहे…. या हंगामात आतापर्यंत खडकवासला धरणातून १२.७९ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे
-
ठाणे महापालिकेच्या रखडलेल्या मेगा नोकर भरतीला हिरवा कंदील
१७७० पदासाठी होणार भरती…. मागील अनेक वर्ष रखडलेली ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची मेगा भरती अखेर मार्गी लावण्याची चिन्हे… गणपती सणानंतर टाटा कन्सल्टन्सी माध्यमातून परीक्षा घेणार… दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देण्यात येणार… महत्त्वाचे म्हणजे लिपिक पदाची एकही जागा भरतीमध्ये नसेल… ठाणे महापालिकेच्या ४५०० रिक्त जागांपैकी 1738 जागा भरल्या जाणार होत्या ,मात्र हा अध्यादेश निघाल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त झाल्याने ठाणे महापालिकेने आता 1770 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे…
Published On - Aug 04,2025 8:10 AM
