Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : मी जर एक राऊंड मारला असता तर…जरांगेंच्या विधानाची राज्यभर चर्चा, काय दिला अल्टिमेटम

Manoj Jarange Patil on Government : राज्याच्या निवडणुकीत महायुतीची भगवी लाट आली. महाविकास आघाडीचा सुपडा वाजला. महायुतीने, विशेषतः भाजपाला एकांगी बहुमत मिळाले. त्यावरून आता राज्यात जरांगे फॅक्टर संपल्याचा दावा करण्यात आला. त्याला मनोज जरांगे यांनी असे खणखणीत उत्तर दिले आहे.

Manoj Jarange : मी जर एक राऊंड मारला असता तर...जरांगेंच्या विधानाची राज्यभर चर्चा, काय दिला अल्टिमेटम
Manoj Jarange Patil
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 4:45 PM

राज्यात महायुतीची त्सुनामी आली आहे. भाजपाला 132 तर मित्र पक्षांच्या पण जागा वाढल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. संपूर्ण महाविकास आघाडीच 50 जागांच्या आता गुंडाळली गेली आहे. लोकसभेला जरांगे फॅक्टरने महायुतीला सुरूंग लावला होता. तसा काही परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला नाही. त्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी असे खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी सरकार गठीत होताच सामूहिक उपोषणाचे हत्यार उपसण्याचे जाहीर केले आहे.

तीच सासू आहे, वठणीवर आणणार

मी समाजाला सांगितलं होतं तू मला ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज आज माझ्या पाठीमागे आहे. आता कोणीही आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणीही आलं तरी समाजासाठी लढावं लागणार आहे. कोणीही येऊ द्या तीच सासू आहे. आम्ही वठणीवर आणू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. पुन्हा आले वळवळ करसान दादागिरी करसान किंवा दहशत वाजवण्याचा प्रयत्न करताना तर त्याचा तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे लागेल. मराठ्यांच्या नादी लागू नका, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आता बेईमानी करू नका

ते आले काय आणि हे आले काय आम्हाला झाडावरच लागणार आहे. ते जरी पुन्हा आले तरी आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार. सरकार काय करते, कोणात किती दम आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. फक्त मराठ्यांची बेइमानी त्यांनी करायची नाही. कारण शेवटी मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. मराठ्यांनी दोघांचाही काम केलं जो पडला त्याचाही केलं आणि तो निवडून आला त्याचाही काम केलं त्यामुळे दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला यायीचं माज आणायचा नाही.

तर 80 ते 90 जणांना बुक्का लागला असता

आपण मैदानातच नव्हतो ज्यावेळेस आपण मैदानात होतो त्यावेळी आपण झटका दाखवलेला आहे. कोणी म्हणत असेल जरंगी फॅक्टर फेल गेला पण मी त्यांना सांगतो की मी मैदानातच नव्हतो. जेव्हा मी मैदानात होतो तेव्हा पाणी पाजलेले आहे. मी जर बाहेर पडलो असतो तर 80 ते 90 जणांना बूक्का लावला असता असेही जरांगे पाटील म्हणाले. काही उमेदवार फक्त 2 हजार 5 हजार दहा हजार अशा मताने निवडून आलेले आहेत.. मी जर एक राऊंड मारला असता तर सगळे उलथे पालथे केले असते, असे त्यांनी वक्तव्य केले.

मागण्या मान्य करा

मराठ्यांशिवाय या राज्यात कोणीही सत्तेवर बसू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाची बेईमानी करायची नाही तर तुमच्या मुंडक्यावर बसलोच समजा. सामूहिक आमरण उपोषण सुरू करू. तिन्ही गॅजेट्स सह कुणबी आणि मराठा एकच आहे या मागण्या मान्य केल्याच पाहिजे नाही तर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे. हे सामूहिक आमरण उपोषण असं असणार आहे की पूर्ण देशात सुद्धा झालेलं नसेल आणि सरकारचं डोकं बंद पाडणार, असे ते म्हणाले.

उपोषणाचा एल्गार

आता निवडणूक झाली तो विषय संपला मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाका. तुमचं काय तुमच्या जातीचं काय तुमच्या अस्तित्वाचं काय आणि तुमच्या लेकराचे भविष्य काय त्यामुळे आता आरक्षणाच बघा सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या भविष्याचा बघा.

हे आता सामूहिक आमरण उपोषण आहे. एकाच दिवशी एकाच वेळी अंतरवाली सराटी मध्ये सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. पुन्हा एकदा संपूर्ण मराठ्यांनी एकजूट होऊन सामुहिक आमरण उपोषणाला आंतरवाली सराटीतल्या तयारीला लागा. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख मी जाहीर करणार आहे.त्यामुळे सर्वांनी आंतरवालीकडे यायचं आहे असा आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं. आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे आणि मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत देखील. आणि यावर मी ठाम आहे. आणि हे आमरण उपोषण आंतरवाली सराटीमध्येच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.