Maharashtra Coronavirus LIVE Update : सोमवार 17 मे रोजी वसई विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोमवार 17 मे रोजी वसई विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 16 May 2021 22:14 PM (IST)

  सोमवार 17 मे रोजी वसई विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद

  वसई विरार : सोमवार 17 मे रोजी वसई विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद

  अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने घेतला निर्णय

  लसीकरणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे अहवान पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे

 • 16 May 2021 21:01 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक, 272 पैकी 133 कैदी कोरोनाबाधित

  उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक

  272 पैकी 133 कैदी कोरोनाबाधित, 49 टक्के कैद्यांना लागण , 9 महिला कैद्यांचा समावेश

  आज 492 रुग्ण, 9 मृत्यू तर 687 बरे – 5 हजार 687 सक्रिय रुग्ण

  बंदिस्त कारागृहात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली

 • 16 May 2021 20:28 PM (IST)

  महाराष्ट्रात 1 कोटी 99 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण 

  महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 99 लाख 12 हजार 924 नागरिकांचे लसीकरण पूर्ण

  1,92,742 लाभार्थ्यांना देण्यात आली लस

  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

 • 16 May 2021 20:16 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 492 नवे रुग्ण

  उस्मानाबाद कोरोना अपडेट

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवे 492 रुग्ण

  09 जणांच मृत्यू तर 687 जणांना डिस्चार्ज

  उस्मानाबाद तालुका 196, तुळजापूर 70, उमरगा 20, लोहारा 30, कळंब 38, वाशी 51, भूम 32, परंडा 55 रुग्ण

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5687 सक्रिय रुग्ण

  उस्मानाबाद आतापर्यंत 48 हजार 956 रुग्ण सापडले

  रुग्ण आढळण्याचा दर 37.90 टक्के

 • 16 May 2021 20:14 PM (IST)

  राज्यात आज 34 हजार 389 नवे कोरोना रुग्ण, 974 रुग्णांचा मृत्यू

  राज्यात आज 34 हजार 389 नवे कोरोना रुग्ण

  राज्यात आज 59 हजार 318 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  राज्यात आज 974 रुग्णांचा मृत्यू

 • 16 May 2021 20:02 PM (IST)

  चंद्रपुरात गेल्या 24 तासात 674 नव्या रुग्णांची नोंद

  चंद्रपूर : गेल्या 24 तासात 674 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासांत 20 मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 77575

  एकूण कोरोनामुक्त : 66226

  सक्रिय रुग्ण : 10097

  एकूण मृत्यू : 1252

  एकूण नमुने तपासणी : 434760

 • 16 May 2021 19:40 PM (IST)

  अमरावती जिल्हात 1175 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

  अमरावती कोरोना अपडेट

  अमरावती जिल्हात आज 1175 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  आज 1289 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  -आज 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

  -जिल्हात आतापर्यंत 82930 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

  आतापर्यंत 71009 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  जिल्हात आतापर्यंत 1250 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  जिल्हात 10671 सक्रिय रुग्ण

 • 16 May 2021 19:38 PM (IST)

  वसई-विरारमध्ये 278 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

  वसई-विरार कोरोना अपडेट

  मागच्या 24 तासात 278 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  आज दिवसभरात 09 जणांचा मृत्यू

  578 जणांनी केली कोरोनावर मात

  वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62,808 वर

  कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 52,030 वर

  एकूण 1264 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9514 वर

 • 16 May 2021 19:00 PM (IST)

  नाशिकमध्ये दिवसभरात 1870 रुग्ण पॉझिटिव्ह, 30 जणांच मृत्यू

  – नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी

  – सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांच्या आत

  – दिवसभरात 1870 रुग्ण पॉझिटिव्ह तर 30 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

  – तर 2862 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  – आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 4 हजार 100 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला

 • 16 May 2021 18:44 PM (IST)

  पु्ण्यात दिवसभरात 1317 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 2985 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे कोरोना अपटेड

  – दिवसभरात 1317 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 2985  रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधित 73 रुग्णांचा मृत्यू. 26 रूग्ण पुण्याबाहेरील

  – 1415 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 459303

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 20589

  – एकूण मृत्यू -7706

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण- 431008

   

 • 16 May 2021 18:41 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यात आज 4519 रुग्णांची कोरोनावर मात

  नागपूर : कोरोनाबधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

  नागपूर जिल्ह्यात आज 4519 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  1133 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर आज 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  एकूण रुग्णसंख्या – 463243

  एकूण कोरोनामुक्त – 424850

  एकूण मृत्यूसंख्या – 8550

 • 16 May 2021 17:39 PM (IST)

  वाशिममध्ये 486 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाच रुग्णांचा मृत्यू  

  वाशिम कोरोना अलर्ट

  जिल्ह्यात आज 05 रुग्णांचा मृत्यू

  486 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

  तर 597 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 16 दिवसात 75 रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवे 8389 कोरोना रुग्ण आढळले.  या 16 दिवसांत 7738 रुग्ण कोरोनामुक्त

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 35749

  सध्या सक्रिय रुग्ण – 4485

  डिस्चार्ज झालेले रुग्ण – 30892

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 371

 • 16 May 2021 17:37 PM (IST)

  नवी मुंबईत कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय, आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी 

  नवी मुंबईत कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय

  अशा प्रकारचा हा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम

  कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाचा तणाव दूर करणारे पुस्तकांचे विश्व ग्रंथालयाद्वारे खुले

  पुस्तकांच्या स्वरूपात मानसिक बळ देण्याचा मनपा आणि let’s read चा प्रयत्न

  पिपीई किट घालून आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोविड सेंटरमध्ये ग्रंथालयाची केली पाहणी

  याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा

  पुस्तके ठेवण्यासाठीचे शेल्फही अत्यंत आकर्षक

  या अभिनव संकल्पनेचे तेथील कोरोनाबाधितांनी केले आनंदाने स्वागत

 • 16 May 2021 17:18 PM (IST)

  पंतप्रधानांच्या माध्यमातून रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मिळाले- देवेंद्र फडणवीस

  बुलडाणा : पंतप्रधान यांच्या माध्यमातून रेमडेसिव्हर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मिळाले

  रुग्णांना यामधून बाहेर काढावे लागेल

  चिखलीमध्ये कोविड सेंटर सुरू करणाऱ्यांचे, स्टाफचे अभिनंदन- देवेंद्र फडणवीस

 • 16 May 2021 17:13 PM (IST)

  नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजराचा धोका वाढला, 61 रुग्णांवर उपचार

  अहमदनगर : नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजराचा धोका वाढला

  जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या तब्बल 61 रुग्णांवर उपचार सुरू

  उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा जिल्ह्यात तुटवडा

  इंजेक्शन शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल

 • 16 May 2021 17:00 PM (IST)

  कल्याण पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

  ठाणे : कल्याण पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

  118 नागरिकांच्या केल्या अँटिजेन टेस्ट

  फक्त एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

 • 16 May 2021 16:58 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस करणार चिखलीतील कोविड सेंटरचे उद्घाटन 

  बुलडाणा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पोहोचणार

  फडणवीस चिखली येथे करणार कोविड सेंटरचे उद्घाटन

   

 • 16 May 2021 12:09 PM (IST)

  कोरोनाच्या लढ्यात आता फॅमिली डॉक्टर्सनी माझा डॉक्टर होऊन कार्य करावं: उद्धव ठाकरे

  कोरोनाची सुरुवात आणि आजचे चित्र समान आहे. कोरोनाशी लढ्यात तज्ज्ञ डॉक्टरांची मदत होतेय. कोरोनाशी लढण्यात डॉक्टरांचं मोठं योगदान आहे. कोरोनाच्या लढ्यात आता फॅमिली डॉक्टर्सनी माझा डॉक्टर होऊन कार्य करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 • 16 May 2021 09:18 AM (IST)

  पिंपरी चिंचवड उघड्यावर कचरा टाकणाऱ्या मेडिकल व्यावसायिकाला 10 हजारांचा दंड वसूल

  पिंपरी चिंचवड

  -उघड्यावर कचरा टाकणाऱ्या मेडीकल व्यावसायिकाकडून 10 हजारांचा दंड वसूल

  -भोसरी -नाशिक हायवेवरील जयहिंद मेडीको या मेडीकल व्यवसायधारकाकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ‘क’ क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांची कारवाई

  -कोविड 19 संसर्ग टाळण्यासाठी शहराचा परिसर स्वच्छ ठेऊन नागरिकांनी रस्तावर थुंकु नये. उघड्यावर कचरा टाकू नये,असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 • 16 May 2021 09:18 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात, वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

  कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरवात

  वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

  16 ते 23 मे दरम्यान असणार कडक लॉकडाऊन

  कोल्हापूरकरांचा लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौकात आणि रस्त्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

  अनावश्यकपणे फिरणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल

 • 16 May 2021 09:16 AM (IST)

  सोलापूर मनपा आरोग्य अधिकाऱ्याची आठ महिन्यात बदली

  सोलापूर– मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर बिरुदेव दुधभाते यांची आठ महिन्यात बदली

  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदावर बदली

  आठवणीतली डॉ. बिरुदेव दूधभाते पूर्णवेळ आरोग्य अधिकारी पदावर होते कार्यरत

  आता पालिकेच्या आरोग्यअधिकाऱ्याचा कारभार प्रभारीवर

 • 16 May 2021 08:04 AM (IST)

  पुणे आरटीओ कार्यालयाला यंदाही कोरोनाचा फटका, 14 दिवसात फक्त 4 कोटी महसूल जमा

  पुणे –

  – पुणे आरटीओ कार्यालयाला यंदाही कोरोनाचा फटका,

  – १४ दिवसात फक्त ४ कोटी महसूल जमा,

  – अक्षयतृतीयेचा मुहूर्त वाहन क्षेत्रासाठी यंदाच्या वर्षीही निराशजनक ठरला,

  – गेल्या १४ दिवसांत ७० दुचाकी तर, १८७ मोटारी शहरात विकल्या गेल्या. मालवाहतुकीची १४१ वाहनांची ग्राहकांनी खरेदी केलीत,

  – त्यामुळे आरटीओच्या तिजोरीत अवघा ४ कोटी १७ लाखांचा महसूल जमा झाला,

  – लॉकडाउनमुळे सध्या शो-रूम बंद आहेत. त्यामुळे वाहन नोंदणीवरही परिणाम झाला आहे,

  – यंदा १ ते १५ मे दरम्यान ७० दुचाकी, १८७ मोटारी, १४१ मालवाहतुकीची वाहने, ११ मोबाईल क्लिनिक, ३ बस, ३ टॅक्सींची नोंदणी झाली आहे,

  – एप्रिल २०१९ मध्ये शहरात तब्बल २२ हजार ८५० वाहनांची नोंदणी झाली होती.

 • 16 May 2021 08:03 AM (IST)

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून विदर्भात 100 रुग्णवाहिका मिळणार

  नागपूर –

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून विदर्भात येणार 100 अंबुलन्स

  एम जी मोटर्स आणि पेटीएम यांच्या सीएसआर फंड मधून मिळणार अंबुलन्स

  अत्याधुनिक सुविधा असलेल्या असेल अंबुलन्स

  गडकरी यांनी या दोन्ही कंपन्या सोबत यांच्या शी संपर्क करून कोविड काळात मदत करण्याचा आवाहन केलं

  या आव्हानाला प्रतिसाद एम जी मोटर्स ने 8 अंबुलन्स तात्काळ पाठविणार असल्याचं सांगितलं तर याचा खर्च पे टी एम उचलणार

  तर उर्वरित अंबुलन्स लवकरच उपलब्ध करून दिल्या जाईल

 • 16 May 2021 08:02 AM (IST)

  नागपूरला मोठा दिलासा, 24 तासात 1510 नवीन रुग्णांची नोंद

  नागपूर –

  45 दिवसा नंतर नागपुरातील कोरोना मृत्यूची संख्या आली 50 च्या खाली

  पॉझिटिव्हीटी दर आला 13 टक्के वर

  नागपूरला मोठा दिलासा

  गेल्या 24 तासात 1510 नवीन रुग्णांची नोंद झाली

  तर 4780 जणांनी कोरोनावर विजय मिळविला

  तर मृत ची संख्या कमी होत 48 वर पोहचली

  नागपुरात आता सक्रिय रुग्णांची संख्या 33 हजार 259 एवढी आहे .

 • 16 May 2021 08:01 AM (IST)

  अमरावतीत म्युकोरमायकोसिस पहिला बळी, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

  अमरावती

  अमरावतीत म्युकोरमायकोसिस पहिला बळी..

  63 वर्षीय महिलेचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू….

  कोरोना होऊन घरी परतल्या नंतर म्युकरमायकोसीसच्या आजाराची झाली होती लागण…

  अमरावती शहरातील साईनगर येथील महिलेचा मृत्यू …

  अमरावती जिल्हात प्रचंड खळबळ…

 • 16 May 2021 08:00 AM (IST)

  नागपुरातील काेराेना व्हॅक्सिनचा दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या वाढली

  नागपूर –

  शहरातील काेराेना व्हॅक्सिनचा दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या वाढली.

  काल लसीचे एकूण १४४६८ डाेस देण्यात आले.

  यामध्ये दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या ७५२३ तर ६९४५ नागरिकांनी पहिला डाेस घेतला.

  तर आज ४५ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  रविवारीही ४५ प्लस वयाच्या लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू राहणार आहे.

  आवश्यकतेनुसार लसीचे वायल उपलब्ध झाल्याने लसीकरणाला गती मिळाली आहे.

  महापालिकेच्या ९६ केंद्रावर लसीकरण सुरू आहे.

 • 16 May 2021 07:02 AM (IST)

  नाशिककरांना दिलासा, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 2 हजारच्या आत

  नाशिक

  – सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 2 हजारच्या आत
  – नाशिककरांना काहीसा दिलासा
  – गेल्या 24 तासात 1851 रुग्ण पॉझिटिव्ह तर 30 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू
  – तर 3 हजार 182 रुग्णांनी कोरोनावर केली मात
  – आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 4 हजार 70 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला

 • 16 May 2021 07:01 AM (IST)

  नाशिक शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 1 लाखांहून अधिकचा दंड वसूल

  नाशिक

  – नाशिक शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर मनपा कडून कारवाईचा बडगा
  – गेल्या 24 तासात 170 नागरिकांवर दंडात्मक कारवाई
  – तब्बल 1 लाख 29 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल
  – कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता,शहर लॉकडाउन असतानाही अनेक नागरिक बेजबाबदारपणे रस्त्यावर
  – अशा नागरिकांवर मनपाच्या भरारी पथकाकडून होतीये कारवाई

 • 16 May 2021 06:59 AM (IST)

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक मनपा प्रशासन अलर्टवर, लहान मुलांसाठी 100 बेडचे हॉस्पिटल उभारणार

  नाशिक

  – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक मनपा प्रशासन अलर्ट
  – इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या हॉस्पिटलमध्ये ही लहान मुलांसाठी 100 बेडचे हॉस्पिटल उभारण्याचा विचार
  – या अगोदर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बिटको रुग्णलयात 100 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे दिलेत आदेश
  – तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी स्पष्ट केल्यामुळे प्रशासन कडून तयारीला वेग

 • 16 May 2021 06:58 AM (IST)

  मुंबईतील कोरोना अपडेट 

  मुंबईतील कोरोना अपडेट 

  २४ तासात बाधित रुग्ण – १४४७

  २४ तासात बरे झालेले रुग्ण – २३३३
  बरे झालेले एकूण रुग्ण – ६३४३१५
  बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९२%

  एकूण सक्रिय रुग्ण- ३६६७४

  दुप्पटीचा दर- २१३ दिवस
  कोविड वाढीचा दर (८ मे -१४ मे)- ०.३२%

 • 16 May 2021 06:57 AM (IST)

  राज्यात कोरोनाबळींचा आकडा वाढताच, सर्वाधिक 960 जणांचा मृत्यू

  राज्यात कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतीच

  राज्यात काल 960 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

  तर शुक्रवारी 695 जणांचा मृत्यू

  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51% एवढा आहे.

 • 16 May 2021 06:56 AM (IST)

  राज्यात काल दिवसभरात 34,848 नवीन रुग्णांची नोंद, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 4 लाखांच्या पार

  राज्यात काल दिवसभरात 34,848 नवीन रुग्णांची नोंद

  राज्यात एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण

  राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53,44,063 हून अधिक

  काल दिवसभरात 59,073 रुग्ण बरे

  राज्यात एकूण 47,67,053 कोरोनाबाधित रुग्ण बरे

  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.2 % एवढे