Anil Gote | ‘Iqbal Mirchiकडून Devendra Fadanvis यांनी 10 कोटी घेतले’

Anil Gote | ‘Iqbal Mirchiकडून Devendra Fadanvis यांनी 10 कोटी घेतले’

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 3:26 PM

इक्बाल मिर्चीकडून (Iqbal Mirchi) देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी घेतले. मी आज ईडीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याविरोधात तक्रार करत आहे, असे अनिल गोटे (Anil Gote) म्हणाले.

इक्बाल मिर्चीकडून (Iqbal Mirchi) देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी घेतले. मी आज ईडीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याविरोधात तक्रार करत आहे, असे अनिल गोटे (Anil Gote) म्हणाले. गँगस्टर इक्बाल मिर्चीशी संबंध असलेल्या वाधवानकडून 10 कोटी असे दोन वेळा भाजपाने फंड स्वीकारला आहे. जर अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी नवाब मलिकांवर अटकेची कारवाई करू शकते, तर फडणवीस यांच्यावरही करावी, असे गोटे म्हणाले. मी आज तक्रार दिल्यानंतर 8 दिवस वाट पाहणार आहे. मी दर मंगळवारी भाजपाच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार, असेही गोटे म्हणाले आहेत. 2014ला भाजपाचे सरकार राज्यात आले, त्यावेळी त्यांनी थेट अतिरेक्यांकडून देणगी स्वीकारली. निवडणूक आयोगाकडेही याचे पुरावे आहेत. त्यामुळे कारवाईची मागणी अनिल गोटे यांनी केली आहे.