AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमलेल्या तमामा हिंदू मातांनो, भगिनींनो आणि… राज्यात आज कुणाकुणाची डरकाळी? वाचा A टू Z

महाराष्ट्रासाठी दरवर्षी दसरा हा सण फार महत्त्वाचा असतो. या दिवशी राज्यात एकूण पाच दसरा मेळावे होतात. वेगवेगळे नेते या दसरा मेळाव्यांत भाषण करतात. त्यामुळे या दिवशी घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष असते.

जमलेल्या तमामा हिंदू मातांनो, भगिनींनो आणि… राज्यात आज कुणाकुणाची डरकाळी? वाचा A टू Z
Dasara Melava 2025 Maharashtra
| Edited By: | Updated on: Oct 02, 2025 | 8:06 AM
Share

Dasara Melava 2025 Maharashtra Update : महाराष्ट्रासाठी दरवर्षी दसरा मेळावा फार महत्त्वाचा आहे. कारण याच दसरा मेळाव्याच्या दिवशी राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी योजना, विधानं केली जातात. दरवर्षी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असतो. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचाही दसरा मेळावा भरतो. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील भगवान भक्तीगड सावरगाव येथे आपला वेगळा दसरा मेळावा घेतात. तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे हेदेखील नारायण गडावर आपला दसरा मेळावा आयोजित करत आहेत. त्यामुळेच आता दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी कोणत्या नेत्याचा दसरा मेळावा कुठे होणार? सोबतच यावेळच्या दसरा मेळाव्याची नेमकी काय तयारी चालू आहे, ते पाहुया…

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी

शिवसेनेची शकलं होण्याआधी दरवर्षी मुंबईतील शिवाजी मैदानावर या पक्षाचा मोठा दसरा मेळावा आयोजित केला जायचा. मात्र आता या पक्षाचे दोन गट पडल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी मैदानावर आयोजित केला जातो. यावेळीदेखील हा दसरा मेळावा शिवाजी मैदानावरच होणार आहे. यंदाचा दसरा मेळावा अनेक अर्थांनी वेगळा ठरण्याची शक्यता आहे. कारण या मंचावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते युतीचीही घोषणा करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी आपल्या भाषणात काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदेच्या मेळाव्याचे ठिकाण बदलले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आपला दसरा मेळावा आयोजित करतात. आपल्या दसरा मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करतात. या वर्षी त्यांचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता. आता मात्र त्यांच्या मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले असून तो यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे हेदेकील रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान दसरा मेळाव्यासाठी आलेल्यांना संबोधित करत असतात. त्यामुळे यावेळच्या दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा 900 एकरवर

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांचाही बीड जिल्ह्यात दसरा मेळावा होणार आहे. बीडच्या नारायणगडावर या दसरा मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे. दरवर्षी नारायणगडावर पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा संपन्न होत असतो. गेल्यावर्षी देखील लाखोंच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला होता. या दसरा मेळाव्याची 350 एकरवर तयारी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पार्किंसह एकूण 900 एकर जमीन दसरा मेळाव्यासाठी तयार केली जात आहे.

भगवान भक्ती गडावर देखील जय्यत तयारी

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील दरवर्षी दसरा मेळावा घेतात. त्यांचा हा मेळावा बीड जिल्ह्यातील भक्तीशक्ती गडावर होत असतो. यावेळीही पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी भव्य मंच उभारण्यात येणार असून मंडपही टाकला जाणार आहे. या मेळाव्यासाठी हेलिपॅड देखील तयार करण्यात आले असून हेलिकॉप्टरने मंत्री पंकजा मुंडे 11 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होतील. सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी त्या ध्यान मंदिरात जाऊन पूजा करतील. त्यानंतर 11.30 वाजता मूर्तीपूजन करुन 11.45 वाजता उपस्थितांना संबोधित करतील.

संघाच्या शस्त्रपूजनाकडेही विशेष लक्ष

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केले जाते. यंदाच्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आपल्या भाषणात स्वयंसेवकांना नेमका कोणता उपदेश करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या भाषणाकडेही संपूर्ण देशाचे लक्ष असेल.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचीही जय्यत तयारी

संघाच्या दसरा मेळाव्यासोबतच दरवर्षी नागपुरात दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमाचीदेखील जय्यत तयारी चालू आहे. 2 ऑक्टोबर रोजी नागपुरात पाऊस येण्याची शक्यता असल्याने या सोहळ्याला येणाऱ्या लाखो अनुयायांची व्यवस्था दीक्षाभूमीच्या परिसरातील शाळा, कॉलेज आणि समाज भवनानमध्ये केली जाणार आहे.  त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून शाळा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शाळांच्या परिसरात सौचालय आणि इतर व्यवस्था केल्या जात आहेत. 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातून लाखोच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर येणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी भोजनदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच  पाऊस आल्यास राहण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.