Nashik | टेम्पोला लागलेल्या आगीत बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

Nashik | टेम्पोला लागलेल्या आगीत बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 4:44 PM

भोपाळ (Bhopal) येथून पुणे विद्यापीठाची कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने 12वीच्या प्रश्नपत्रिका (Question paper) या आगीत (Fire) जळून खाक झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आलीय.

भोपाळ (Bhopal) येथून पुणे विद्यापीठाची कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने 12वीच्या प्रश्नपत्रिका (Question paper) या आगीत (Fire) जळून खाक झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आलीय. पहाटे साडे सहाच्या सुमारास संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटानजीक ही घटना घडलीय. 4 मार्च रोजी होणाऱ्या 12वीच्या परीक्षेवर मात्र कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलंय. भोपाळ येथून पुणे विद्यापीठाची गोपनीय कागदपत्रे घेऊन निघालेल्या टेम्पोला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटानजीक अचानक आग लागली. गाडीला आग लागताच ड्रायव्हर आणि क्लिनर गाडी थांबवून खाली उतरत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी भीषण असल्याने आग विझवण्यात ते असमर्थ ठरले. टेम्पोच्या समोरच्या भागात अचानक आगीचे लोळ सुरू झाले आणि बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. महामार्ग पोलिसांनी संगमनेर नगरपालिका आणि साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडीतील बहुतांश कागदपत्रे आगीत भस्मसात झाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय.