हिमाचल प्रदेशच्या राज्य परिवहन महामंडळाने अर्थात हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (HRTC) 297 इलेक्ट्रिक बसेस थेट विकत घेण्याची ऑर्डर दिली आहे.
1 / 9
निविदा प्रक्रियेनंतर या बसेस पुरवण्याची जबाबदारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला देण्यात आली आहे. त्या सदर्भातील एलओए कंपनीला देण्यात आले आहे.
2 / 9
या सर्व ई-बसेस 9 मीटरच्या असून त्या नॉन एसी प्रकारातल्या आहेत.
3 / 9
ही ऑर्डर भारताच्या कोणत्याही राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यत केलेली सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची खरेदी आहे.
4 / 9
हिमाचल प्रदेशच्या आव्हानात्मक डोंगराळ प्रदेशात चालवण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेल्या आहेत.
5 / 9
या इलेक्ट्रिक बसेसमध्ये बसण्यासाठी 30 आसनांची क्षमता आहे.
6 / 9
एका चार्जवर 180 किलोमीटरपर्यंत बस प्रवास करू शकते. या ऑर्डरची किंमत 424 कोटी रुपये आहे.
7 / 9
ओलेक्ट्राला औपचारिकपणे एचआरटीसीचे कार्यकारी संचालक डॉ. मुरारी लाल (एचपीएएस) यांच्याकडून एलओए देण्यात आले आहे.
8 / 9
ऑलेक्ट्राला ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. के. व्ही. प्रदीप यांनी एवढ्या मोठी ऑर्डर ही आमच्यासाठी सन्मान आणि गौरवाची गोष्ट असल्याचे सांगीतले .