Nanded ShivaJayanti | चित्रकारानं भाकरीवर साकारली शिवप्रतिमा, कैलाश खानझोडेची अनोखी कलाकृती

| Updated on: Feb 19, 2022 | 5:23 PM

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीचा राज्यभर उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं शिवरायांना वंदन करत आहे. नांदेडमध्ये (Nanded) एका चित्रकाराने (Painter) चक्क भाकरीवर शिवप्रतिमा काढत शिवरायांना अनोख्या पद्धतीने वंदन केलंय.

Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीचा राज्यभर उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं शिवरायांना वंदन करत आहे. नांदेडमध्ये (Nanded) एका चित्रकाराने (Painter) चक्क भाकरीवर शिवप्रतिमा काढत शिवरायांना अनोख्या पद्धतीने वंदन केलंय. शिवजयंतीनिमित्त कैलाश खानझोडे या चित्रकारानं ही अनोखी कलाकृती सादर केलीय. जेजे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असलेल्या कैलाशनं भाकरीवर शिवाजी महाराज आणि जाणता राजा अशा दोन वेगवेगळ्या सुंदर प्रतिमा तयार केल्या आहेत. छत्रपती शिवरायांमुळेच आम्हाला भाकरी मिळाली, अशी भावना त्यामागे असल्याचं कैलाशनं सांगितलंय. कैलाशनं काढलेलं हे चित्र आज नांदेडमध्ये आकर्षणाचा विषय ठरलं. अत्यंत सुंदर असं हे चित्र सर्वांनाच भावतंय. अनेकजण जे पाहणारे आहेत, त्यांनी कौतुक केलंय. याचे व्हिडिओही आता सर्वत्र फिरत आहेत.